नंदुरबार

दुचाकीसह चार चाकी वाहनांवर “प्रेस” लिहलेल्या बोगस पत्रकारांची चौकशी करण्याची मागणी! जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेचे शहर वाहतूक शाखेला निवेदनातून साकडे

नंदुरबार
जिल्ह्यात काही असामाजिक घटकांनी पत्रकारितेचे नाव घेऊन गैरप्रकार करण्याचे प्रकरण निदर्शनात आले आहे. शहरासह जिल्ह्यात काही व्यक्ती आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर ‘प्रेस’ असे नाव लिहून बेकायदेशीरपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे खऱ्या पत्रकारांच्या प्रतिमेस धक्का बसत असून, काही गुन्ह्यांमध्ये अशा बोगस प्रेस वाहनांचा वापर झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत नंदुरबार शहर वाहतूक शाखेला दिनांक २८ रोजी निवेदन देण्यात आले आहे.

या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा बोगस पत्रकारांना ओळखून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारचे प्रकरण घडू नये यासाठी वाहनांवर ‘प्रेस’ असे लिहिण्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेने या प्रकरणाची दखल घेत, सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी शाखेने शहरातील सर्व रस्ते आणि चौकाचौकांवर विशेष पथक तैनात करून अशा वाहनांची शोध मोहीम हाती घेतली आहे. तसेच, नागरिकांनाही अशा प्रकारच्या संशयास्पद वाहनांबद्दल पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना निवेदन देते वेळी जिल्हा पत्रकार संघटनेचे समन्वयक विशाल माळी, साप्ता. वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष प्रविण चव्हाण, उपाध्यक्ष सुभाष राजपूत, कार्याध्यक्ष महेंद्र चौधरी, सचिव सुबोध अहिरे, सहसचिव अजिम आशमी, सदस्य दिलीप बडगुजर, विष्णू पाटील, आफिक मिर्झा, मनोज समशेर तसेच किशोर गवळी, प्रदीप गरुड, जितेंद्र जाधव, जगदिश ठाकूर, पंकज सिंधी, मिलिंद भालेराव, मोईन शाह आदी उपस्थित होते.

प्रविण चव्हाण, नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button