जात धर्म हा राष्ट्रवादीचा कधीही निकष नाही तर माणुस हाच विकासाच केंद्र बिंदू!पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन.

नंदुरबार(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दीन दलित आदिवासी व अल्पसंख्यांकांना घेवून चालणारा एकमेव पक्ष आहे.
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.त्यामुळे या जिल्हयात विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध़ झाली आहे. कार्यकर्त्यांनी कधीही फोन लावला तरी मी त्यांचा फोन उचलणार. संघटन मजबूत झाले पाहिजे.यासाठी येणाऱ्या सर्व स्वराज्य़ संस्थांच्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपले शेवटचे स्टेशन आहे.जात ,पंथ,धर्म हा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचा कधीही निकष नाही.तर माणूस हाच केंद्रबिंदू मानून विकास घडवण्याचे काम आपल्याला सर्वांना करायचे आहे.
यासाठी झारीतील शुक्राचार्यांना बाजूला सारुन शेतकऱ्यांच्या खात्यांवर डीबीटी तत्वावर थेट अकाऊंटमध्ये पैसे कसे पडतील याचा विचार केला जाणार आहे,असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भगवती लॉन्स़ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले.
यावेळी क्रेनच्या सहाय्याने भला मोठा पुष्पगुच्छ़ त्यांच्या गळयात घालून त्यांचे भव्य़ स्वागत करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, भरत गावित, रतन पाडवी, मोहन शेवाळे,मोहनभाऊ माळी आदींसह अनेक मान्य़वर यावेळी उपस्थित होते.
माणिकरा कोकाटे म्हणाले, माणसे प्रवाहाबाहेर फेकले जातात.त्यांना मुळ प्रवाहात आणणे हेच राज्यशासनाचे ध्येय आहे.अजीत पवार यांचा कामाचा धडाका फार मोठा आहे.त्यांच्या खांदयाला खांदा लावून आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे.शेवटी आकडयांच्या खेळावर राजकारणाचे गणित अवलंबून असते. हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्ऩ कार्यकर्त्यांना दयावा लागेल.
जनतेत विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे.हे लक्षात घेतले पाहिजे.काँग्रेस पक्षाची परिस्थिती अंत्यंत वाईट झाली आहे.अठरा पगड जाती,अल्पसंख्यांक कार्यकर्ते यांना घेवून आपल्याला चालावे लागणार आहे.
नंदुरबार जिल्हा हाआदिवासी बहूल भाग असूनही नंदुरबार जिल्हयात सर्वात अधिक मतदान होते तर शहरात राहणारे माणसे बोलतात खुप पण मतदान करीत नाहीत,जणू राजकीय आणि शासकीय यंत्रणेंशी त्यांचे काहीच घेणे देणे नाही.मात्र हीच माणसे पुढाऱ्यांच्या पुढे पुढे राहतात. हेच लोक झारीतले शुक्राचार्य म्हणून त्रास देतात.मला कधीही सत्ता संपत्तीचा मोह झाला नाही.केवळ अजीतदादांच्या आदेशाचे पालन करतो आहे. सर्व कार्यकर्त्यांनी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. विकास हा केवळ भाषणाने होत नाही किंवा हाताच्या स्पर्शाने होत नाही त्यासाठी हातात सत्ता असायला हवी.ती कार्यकर्तेच मिळवून देवू शकतात,असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातीपासूनच्या काळातील आढावा घेत मंत्री महोदयांसमोर मांडला.
कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.जिल्हा कार्यकारिणी,तालुका अध्यक्ष,विविध सेलचे अध्यक्ष यांना पालकमंत्रीच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रणजीत राजपूत यांनी तर आभार मधूकर पाटील यांनी मानले.
प्रविण चव्हाण नंदुरबार.