क.पू.पाटील विद्यालयात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

नंदुरबार
तालुक्यातील भालेर येथील क.पू.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इ.१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित भालेर येथील क.पू.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, जगदीश पाटील, हिम्मत पाटील, अभिमन्यू पाटील, प्राचार्या विद्या चव्हाण, पर्यवेक्षक एम.बी.अहिरे,प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी भास्कर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्या विद्या चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
प्रविण चव्हाण नंदुरबार