समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुनीता गुलाले उद्या दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन पथसंचालनात घेणार सहभाग

तळोदा
येथील समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुनीता गुलाले हिची 26 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पथसंंचालन शिबिरात निवड करण्यात आली आहे.
सदर विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रतिनिधित्व दिल्ली येथे करणार आहे.
सदर विद्यार्थ्यांची निवड ही प्रादेशिक संचालक प्रादेशिक संचालनालय रासेयो प्रादेशिक कार्यालय पुणे यांचे निर्देशाद्वारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पश्चिम विभागीय प्रजासत्ताक दिन पूर्व निवड शिबिरात करण्यात आली असून महाराष्ट्र संघाचे सुनीता गुलाले या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली होती. सदर विद्यार्थिनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.
या निवडसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष भरतभाई माळी, उपाध्यक्ष रोहित माळी तसेच संचालक मंडळ यांनी सुनीता गुलाले हिचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा वसावे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ विजय माहेश्वरी राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक प्रा डॉ सचिन नांद्रे यांनी सुनिता गुलाले हिचे कौतुक केले. सदर विद्यार्थिनीला मार्गदर्शन हे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा रामचंद्र परदेशी यांनी केले.