आ. सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून नंदुरबार शाळांना संगणक आणि पोडिअम वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी)
नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून नंदुरबार तालुक्यातील 17 शाळांना संगणक व 19 शाळांना पोडीअम वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदुरबार तालुका विधायक समितीचे संचालक किरण रघुवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत विद्यालयाचे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, शिक्षणशास्त्र महविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .नंदा वसावे, प्राचार्य डॉ सुनील कुवर .स्वीय सहाय्यक भाऊसाहेब पानसरे, पंकज पाठक ,राजेश शहा ,सुरेंद्र पाटील, सुनील पाटील, विलास पाटील,तारकेश्र्वर पटेल, सयाजी पाटील, चंद्रशेखर लोखंडे,अश्विन खिवसराआदी उपस्थित होते.
यावेळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे संचालक किरण रघुवंशी यांच्या हस्ते शाळांना ऑडिओ व संगणक संच देण्यात आले.सध्याच्या जगात अद्यावत साहित्य शाळांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.त्यावरून आ.तांबे यांची दूरदृष्टी लक्षात येत असल्याचे मत संचालक किरण रघुवंशी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला संगणक संच अभिनव विद्यालय नंदुरबार, एकलव्य विद्यालय नंदुरबार, इंदानी हायस्कूल कोपर्ली, महिला महाविद्यालय नंदुरबार, नटावदकर प्राथमिक विद्यालय नंदुरबार, के.डी. गावित माध्यमिक विद्यालय पिपळोद, ईसाईनगर, कोठली, कोरिट, गुजरभवाली, नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार, सरदार पटेल प्राथमिक शाळा नंदुरबार, प्राथमिक विद्यालय शेल्टी, प्राथमिक आश्रम शाळा नांदरखेडे, समता जुनिअर कॉलेज धानोरा, साधना विद्यालय शनिमांडळ या शाळांना देण्यात आले तसेच पोडियम वाटप अँग्लो उर्दू हायस्कूल, नंदुरबार, पि.के. पाटील माध्यमिक विद्यालय,नंदुरबार, अभिनव विद्यालय,नंदुरबार, मिशन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार, कमला नेहरू विद्यालय,नंदुरबार,के.डी.गावित सैनिकी विद्यालय, पथराई, जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार जी.टी. पाटील महाविद्यालय नंदुरबार, महात्मा फुले हायस्कूल, नंदुरबार,राजे शिवाजी विद्यालय,नंदुरबार,हि. गो श्रॉफ हायस्कूल नंदुरबार, सरदार पटेल प्राथमिक शाळा, नंदुरबार, सिटी हायस्कूल नंदुरबार, स्वामी विवेकानंद हायस्कूल,नंदुरबार आदी शाळांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.मयूर ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब पानसरे यांनी केले. कार्यक्रम यस्वीतेसाठी गणेश यादव, किरण वरपे, निवृत्ती गावडे, विलास पाटील यांनी परिश्रम घेतले
प्रविण चव्हाण नंदुरबार