अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुकाध्यक्षपदी जगदिश सोनवणे

नंदुरबार (प्रतिनिधी)
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी जगदीश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष वंदना तोरवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नियुक्ती पत्र प्रदान झाल्यानंतर नंदुरबार एसटी आगारात प्रवासी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत काम करीत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतीची जबाबदारी सोनवणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
त्यांना नंदुरबार येथील कार्यालयात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक डी सी पाटील, जिल्हा सदस्य रणजीत राजपूत, प्रा देसले, पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक विशाल माळी, तळोदा ग्राहक पंचायत सदस्य भगवान माळी, पत्रकार जितेंद्र जाधव, ज्ञानेश्वर गवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रवासी दिना निमित्त नंदुरबारच्या बस आगारात एसटी वाहक. चालक तसेच प्रवाशांना गुलाब पुष्प देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. तालुका अध्यक्ष जगदीश सोनवणे, जिल्हाध्यक्ष वंदना तोरवणे, उदय निकुंभ, यांनी पुष्प देवून सर्वांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी एसटी महामंडळाचे कर्मचारी पावरा आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
प्रविण चव्हाण,प्रतिनिधी