राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

नवापुर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शहारातील ग्रामीण रूग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अनेक दिग्गज शरद पवारांना सोडुन गेलेत. परंतु पक्षाशी निष्ठावंत राहुन नव्या उमेदने कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्षाला बळकटी देण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो. अशा सदिच्छा नवापूर तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्यात.
यावेळी, नवापूर शहर अध्यक्ष गोलू राजपूत, तालुका युवक अध्यक्ष नयनबाबा वसावे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उप अध्यक्ष आशिष गावित, जिल्हा सचिव लक्ष्मी्मीकांत पाठक, नवापूर तालुका बूथ अध्यक्ष राजेंद्र वसावे, नवापूर शहर उप अध्यक्ष अल्ताफ मिर्जा, नवापूर शहर सचिव राजू भाऊ गावित,जितेंद्र फुलसिंग वसावे,कुणाल नरभवर. यश वसावे, कल्पेश गावित ,रोहन वळवी,प्रदीप मावची,आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आजी माजी पदाधीकारी उपस्थित होते.
योगेश खैरनार,प्रतिनिधी