संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

अक्कलकुवा
15 फेब्रुवारी कर्मयोगी, क्रांतिवीर, संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती अक्कलकुवा अधिकारी कर्मचारी रुंद व समस्त बंजारा समाजबांधव आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते महाराजांची प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.आमदार यांनी सर्व समाज बांधवांना अभिवादन केले.
मनोगत प्रसंगी,संतांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करून संबंध मानव जातीचा कल्याण होते,असे मत व्यक्त केले.तसेच ललित जाठ यांनी समाजाचा इतिहास व्यक्त केला.
सदर कार्यक्रम प्रसंगी काना नाईक,जगदीश चित्रकथे, देवा दादा,विनोद कामे,गणा नाईक, श्रावण राठोड, बल्लू पवार, वर्जन पवार,सुरेश पवार, जगदीश चव्हाण व अक्कलकुवा अधिकारी कर्मचारी वृंद व समस्त बंजारा समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मगन राठोड यांनी तर मान्यवरांचे आभार सुदाम राठोड सर यांनी मानले.
प्रविण चव्हाण नंदुरबार