विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र संपन्न

नंदुरबार
दिनांक 17 फेब्रुवारी 2025, रोजी नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंग भैया रघुवंशी विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे ” 1) डिजिटल युगातील फसवणूक आणि प्रतिबंधात्मक कायदे
2) नवीन फौजदारी कायद्यातील बदल
या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन केले की, आता चे युग म्हणजे ऑनलाइन चे युग आहे आपण सगळेच जण रोज ऑनलाइन व्यवहार करत असतो. या मुळे जरी जीवन सोपे झाले आहे पण त्यासोबत ऑनलाइन फ्रॉड चे प्रमाण देखील वाढलेले आहे. या ऑनलाइन फ्रॉडला आपण कसा आळा घातला पाहिजे जसे स्ट्रॉंग पासवर्ड ठेवने, अनोळखी व्यक्तीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट रिजेक्ट करणे इत्यादी. तसेच प्रा.डॉ.एन डी चौधरी यानी नवीन फौजदारी कायद्यामधील बदल याच्यावर देखील मार्गदर्शन केले. नवीन कायद्यात झिरो एफ आय आर मुळे कसे लोकांना फायदा होईल हे देखील मुलांना समजून सांगितले.
सदर चर्चासत्राचे प्रास्ताविक विद्यार्थी सेमिनार कमिटीचे समन्वयक प्रा. डॉ.आशा आर. तिवारी यांनी केले. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन डिजिटल फ्रॉड कसे घडतात व त्यांच्यासाठी कोणते कायदे आहेत हे स्पष्ट केले.
चर्चासत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यात अनुष्का जवंजाळकर, देवयानी शेवाळे , निकिता ठाकूर, हर्षल शिंदे, बिंदिया ब्राह्मणे, सायमा पिंजारी, उन्नती दवानी, कल्पना पावरा, कालूसिंग वाळवी,दर्शना वसावे, काजल खरे, संजना सुंदरानि, गौतम वाघ, तात्याजी पवार, संतोष माणिक, रामदास पावरा व राम पवार यांनी आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.आशा आर. तिवारी यांनी केले.
चर्चासत्र आयोजनासाठी भारताचे माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ॲड. राजेंद्र रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी तसेच सर्व संचालक मंडळाने प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी कार्यक्रम भविष्यात राबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.