तळोदा

अवैध लाकडाने भरलेला ट्रक जप्त; चालक फरार

तळोदा
तालुक्यातील अमंलपाडा ते सतोना हद्दीतून अवैध लाकुड वाहतुक करणारा टाटा ट्रक अक्कलकुवा वनक्षेत्रपाल यांच्या पथकाने जप्त केला आहे.

मंगळवार दिनांक ४ मार्च रोजी अक्कलकुवा वनक्षेत्रपाल यांच्यासह शासकिय वाहनाने अक्कलकुवा ते मोदलपाडा महामार्गवर रात्री ११:३० वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना गुप्त बातमी मिळाली की, अंमलपाडा ते सतोना दरम्यान अवैध लाकुड होत आहे.

मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वनविभागाने सापळा रचून तळोदा तालुक्यातील अंमलपाडा फाटा ते सतोना हद्दीत अवैध मिक्स आडजात लाकडाने भरलेला वाहन क्रमांक GJ१६T९५५४ टाटा ट्रक पकडला. परंतु अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला.
पकडलेला ट्रक मुद्देमालासह जप्त करण्यासाठी खाजगी चालकाला बोलावून अक्कलकुवा आगारात जमा करण्यात आला आहे.

सदरची कारवाई अक्कलकुवा वनक्षेत्रपाल ललित गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश काळे, सामजी वसावे, वाहनचालक तुळशीराम पाडवी यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button