नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

तळोदा
शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे तळोदा गट साधन केंद्र गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर ऍड.राहूल मगरे, ऍड.सचिन राणे, ऍड.स्वाती पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी एम महाले, सचिव संजयभाई पटेल, वतनकुमार मगरे, संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखिया, संतोष केदार, अल्पेश देसाई उपस्थित होते.
नेमसुशिल शैक्षणिक समूहात वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी अश्विनी भोपे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून विद्यामंदिरातील प्रगतीचा प्रवास सादर केला.
सचिन राणे यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशेष कौतुकास्पद नेमसुशिल शैक्षणिक समूहातून आदर्श गणपती रॅली लोकमान्य टिळक पथकास तर आदर्श शिक्षिका अक्षता बारी प्रोत्साहनपर दिपाली एच पाटील, आदर्श टंकलेखक रोहित यादव, आदर्श वाहनचालक भूषण पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले. संस्थेच्या वतीने आदर्श पालकांना देखील विशेष पुरस्कार देऊन सन्मानित
करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी, प्रिन्सिपल प्रशांत शिंपी, मुख्या.गणेश बेलेकर, मुख्या.श्रीमती भावना डोंगरे, उप प्राचार्या कल्याणी वडाळकर, अर्चना पाडवी, मनिषा पाटील तसेच विद्यामंदीरातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अरुण कुवर व रेखा मोरे यांनी केले.