नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात मराठी गौरव व विज्ञान दिवस साजरा

तळोदा
शहरातील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिरात मराठी गौरव दिवस व राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी मुख्याध्यापिका पुष्पा बागुल मुख्याध्यापक गणेश बेलेकर होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषा उगम व भाषेचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच विज्ञान दिवसानिमित विद्यार्थ्यांनी लहान मोठे प्रयोगांचे सादरीकरण केले. प्रसंगी विद्यार्थिनींनी विज्ञान गीतावर नृत्य व नाटिका सादरीकरण करून विज्ञानाची कास धरा असा संदेश दिला.
मुख्याध्यापिका बागुल यांनी मनोगतातून मराठी भाषेची पार्श्वभूमी,सौंदर्य आणि अलंकार यावर प्रकाश टाकला तसेच मराठी आणि विज्ञान यांचा परस्पर संबध असून दैनंदिन जीवनात कळत न कळत वापर होतो याची उदाहरणे दिलीत.
कार्यक्रमाला विज्ञान शिक्षिका अश्विनी भोपे यांचे मार्गदर्शन लाभले तर अरुण कुवर, कमलेश पाटील, सागर मराठे, प्रतिभा गुरव, अंकित डोंगरे, शैलेंद्र पाटील, समाधान मराठे, मोहनभाऊ, पोपटभाऊ आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राजपूत, सुमित मराठे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार कोमल पटेल या विद्यार्थिनीने मानले.