तळोदा

पुन्हा आला बिबट्या! हल्ल्यात महिलेचा मृत्यू ;गावकऱ्यांचा वनविभागावर संताप

तळोदा : तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे गावकऱ्यांनी वनविभागावर संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांना बिबट्या मुक्त संचार करताना आढळून येत होता. त्यासंदर्भात तळोदा वनविभागास वारंवार कळविले होते. बिबट जेरबंद करणेबाबत अर्ज करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. परंतु वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे आज पुन्हा एका महिलेचा जीव गेला आहे.

बिबट मानव संघर्ष संपता संपेना
अधिक वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात ललिताबाई अशोक पाडवी (४५) व त्यांचे पती अशोक पाडवी हे आपल्या उसाच्या शेतात पाणी भरत होते. त्यांच्या उसाच्या शेताला लागून मक्याचे शेत आहे. उसाच्या शेतात पाणी भरत असताना ललिताबाई या मक्याच्या शेतालगत अवघ्या आठ ते दहा फुटाच्या अंतरावर होत्या. त्याचवेळी मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना मक्याच्या शेतात फरफटत नेले. त्याचवेळी घडलेला प्रकार त्यांचे पती अशोक पाडवी यांच्या लक्षात आला. अशोक पाडवी यांच्या हातात निंदणी करण्याच्या विळा होता. विळा घेऊन त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे ललिताबाई यांना बिबट्याने मक्याच्या शेतात सोडून पळ काढला. मात्र ललिताबाई यांच्या गळ्याला जबड्यात पकडल्याने त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता.

त्यानंतर अशोक पाडवी यांनी आरडाओरडा केल्याने शेतात काम करत असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी गाव घेतली. ललिताबाई यांना तात्काळ गणेश बुधावल गावात आणले गेले. मात्र तोपर्यंत त्यांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

मयत ललिताबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात आणण्यात आला आहे. या घटनेमुळे गणेश बुधावलसह पंचक्रोशी पुन्हा हादरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button