वडाळी,तोरखेडा परीसरात खुलेआम गुटखा विक्री;घरपोच पोहोचविला जातो गुटखा, पोलिसांचे सर्रास दुर्लक्ष

शहादा
गेल्या काही महिन्याभरापूर्वी शहादा शिरपूर रस्त्यावरील बामखेडा व वडाळी गांवाच्या मधोमध नंदुरबार गुन्हे शाखा विभागाने विमल नामक गुटख्यावर कारवाई केली होती.मात्र गुटखा माफियांनी आठ ते दहा दिवस गुटखा विक्री तात्पुरती बंदी केलेली पाहायला मिळाले.
नंतर पुन्हा गुटखा किंग यांनी बे झिजक कोणाला न घाबरता बिंधास्तपणे खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.गुटखा विक्रीत्यांकडून वडाळी सह तोरखेडा परीसरात घरपोच माल पोहचवला जात आहे.मात्र स्थानिक पोलीसांनी याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले आहे.
वडाळी हे गुटख्याचे केंद्र बिंदू मानले जात असून इथून खेड्यापाड्यात गुटखा पोहचविला जात असल्याचे दिसून येत आहे.पोलीसांना सगळी खबर असून सुद्धा गुटखा माफियांचाकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय ? वडाळी परीसरात गुटखा विक्री करण्याऱ्या गुटखा किंगला कोणाचा आशिर्वाद लाभत आहे.यामुळे स्थानिक पोलीसांचा कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पोलीसांकडे बघण्याचा दृष्टिकोन सुज्ञ नागरिकांकडून बदलत चालला आहे. तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना खाकीचा धाक नसल्याने बिनधास्तपणे खुलेआम संगनमताने अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत नागरीकांचा पोलिसांवरील विश्वासाला ठेच लागल्याचा प्रकार दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांना चालना न देण्याचा सक्तीच्या सुचना असून स्थानिकांकडून परस्पर अवैध धंदे सुरू आहेत. जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी गुटखा माफिया विरोधात कारवाई करण्यात आली. मात्र यांची भिती व पोलीसांचा धाक नसल्याने बिनधास्तपणे खुलेआम गुटखा विक्री जैसे थी पुन्हा बघायला मिळते.काही गुटखा व्यावसायिकांनी तर घरपोच गुटखा सोय देखील केली आहे.या गुटख्यामुळे तरूण मुले व्यसनाधीन होतांना तसेच कॅन्सर सारख्या आजाराला आमंत्रण देतांना दिसू लागले आहेत.
गुटखा बंदी फक्त नावालाच उरली का? असा ही प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक पोलीसांनी याकडे डोळेझाक का केली आहे? कारवाई का केली जात नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा गुटखा माफियांचा शोध घेवून पोलीसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.
लाला चव्हाण, शहादा तालुका प्रतिनिधी