नंदुरबार
वर्गणी वसुलीच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण एस. दत्त यांचा इशारा

नंदुरबार :– सण आणि उत्सवांच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी वसूल करण्याच्या तक्रारींची दखल घेत, अशा गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण एस. दत्त यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही खाजगी व्यक्ती, व्यापाऱ्यांकडून अथवा नागरिकांकडून जबरदस्तीने, दमदाटी करून किंवा अन्य अवैध मार्गाने वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर आणि त्यांच्या साथीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
नागरिकांनी जबरदस्तीच्या वर्गणीपासून सावध राहावे आणि अशा घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार
प्रविण चव्हाण, नंदुरबार