जिल्हा पोलीस दलात “स्मार्ट ई-बीट” प्रणाली कार्यान्वित..! गुन्हेगारीच्या घटना तपासात येणार गती

- नंदुरबार जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हयात “स्मार्ट ई-बीट” प्रणालीचे पालकमंत्री मा.ना. अॅड. श्री. माणिकराव कोकाटे यांचे हस्ते दि. 07/04/2025 रोजी उद्घाटन करण्यात येऊन सदर प्रणाली जिल्हयाभरात कार्यान्वित करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीसांकडून जनतेच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थिती वाढविण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये जिल्हयातील महत्वाचे ठिकाणांची निगराणी ठेवण्यासाठी केंद्रीकृत “स्मार्ट ई-बीट” प्रणाली लागू करण्यात आली असुन त्यात धार्मिक स्थळे, एटीएम, बँका, रहिवासी भाग, शाळा, बाजारपेठ परिसर, रेल्वे, बस स्थानक आणि गावांचा समावेश आहे. यामध्ये सर्व ठिकाणी GPS प्रणालीद्वारे जिओ-टंग करण्यात आले असून त्याद्वारे 24*7 अशी सतत गस्त घालण्यासाठी बीट मार्शल्सना स्मार्ट ई-बोट सॉफ्टवेअरने सुसज्ज करण्यात आले आहे. सदर बीट मार्शल हे दोन शिफ्टमध्ये ठरवलेल्या भागांमध्ये गस्त घालून सतर्क राहतील. तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, वरीष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्षातील अधिकारी देखील संबंधित बीट मार्शल यांचेवर लक्ष ठेवू शकतील व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करु शकतील.

“स्मार्ट ई-बीट” प्रणालीची वैशिष्टये-
पोलीस कार्यप्रणालीचे डिजीटायझेशन
घडणा-या घटनांची तात्काळ माहिती उपलब्ध होणे
हद्दीतील गुन्हेगारांची तात्काळ माहिती मिळणेसाठी
चोरीस गेलेल्या वाहनांचा तात्काळ शोध घेणेसाठी
महत्त्वाचे व गंभीर घटनांची माहिती तात्काळ प्रसारित करण्यासाठी
बीट मार्शलचे कामगिरीचा अचूकपणे आढावा घेणेसाठी
गुन्हेगारीचे हॉटस्पॉट व क्राईम हिट मॅप्ससाठी
याप्रणालीमध्ये आणखी एक महत्वाचे वैशिष्टय म्हणजे “Locked Home अलर्ट सेवा” असून यामध्ये नागरिक हे कोठे बाहेरगावी जात असल्यास ते आपल्या बंद घराची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास कळवतील, त्याद्वारे सदर भागात बीट मार्शलकडून विशेष गस्त घालण्यात येईल व काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास घर मालकाला तात्काळ सुचना देखील पाठविली जाईल.
सदर तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हयातील सर्व बीट मार्शलचे कामगिरीचा आढावा काही सेकंदात घेता येतो, ज्यामुळे बीट मार्शल्सचे कामामध्ये पारदर्शकता सुनिश्चित होते. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या गुन्हे आढावा बैठकीत सदर “स्मार्ट ई-बीट” प्रणालीची कामगिरी तपासुन त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या बीट मार्शलचा सन्मान देखील करण्यात येणार असून या नवीन संकल्पनेमुळे पोलीस विभाग अधिक स्मार्ट, जलद आणि प्रभावी होऊन नंदुरबार जिल्हयातील नागरिकांना सुरक्षितता आणि विश्वास मिळवून देण्याचे काम या “स्मार्ट ई-बीट” प्रणालीद्वारे होणार असल्याचे पोलोस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी यावेळी सांगितले