नंदुरबार

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात; नागरिकांसाठी सोय व जनतेतील संवाद होणार सुलभ

नंदुरबार
जिल्हा पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात

नागरिकांच्या सोयीसाठी आणि पोलिस व जनतेमधील संवाद सुलभ करण्याच्या दृष्टीने, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांपर्यंत सुलभ व सहजतेने पोहोचता यावे यासाठी करण्यात आला आहे.

यापूर्वी पोलिस अधिका-यांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकांद्वारे होत असे, परंतु अधिकारी बदली झाल्यास हे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्य नारिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक पदासोबत स्थिर राहणार असून, अधिकारी बदली झाल्यास देखील मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पोलीसांशी सतत संपर्क साधता येईल.

या उपक्रमाबाबत बोलताना नंदुरबारचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले, “नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी पोलिसिंगच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या मोबाईल क्रमांकांच्या साहाय्याने नागरिकांना तात्काळ मदत मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक कार्यक्षम प्रतिसाद पोलीस दलाकडून मिळेल.”

हे अधिकृत मोबाईल क्रमांक जिल्हा पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर व अन्य सार्वजनिक माध्यमांवर प्रसिद्ध केले जातील, जेणेकरून नागरिकांना ते सहज उपलब्ध होतील. यामुळे केवळ संपर्क सुलभहोणार नाही तर मोबाईलद्वारे होणाऱ्या अधिकृत संवाद, माहिती देवाण-घेवाण आणि नागरिकांशी होणारे व्यवहार हे आता संस्थात्मक स्वरूपात सुरक्षित राहतील.

नंदुरबार जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी, पारदर्शक आणि तंत्रस्नेही पोलिसिंगसाठी सदैव कटिबद्ध आहे.

सोबत :- अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादी आहे.
नंदुरबार

पोलीस अधीक्षक, नंदुरबार
मोबाईल क्रमांक
9028954501

अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार
9028954502

उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उप विभाग
9028954503.

उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा उप विभाग
9028954504

उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा उप विभाग
9028954505

पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), नंदुरबार
प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार
9028954506
9028954508

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार
9028954510

प्रभारी अधिकारी, नंदुरबार शहर पोलीस ठाणे
प्रभारी अधिकारी, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे
9028954512
9028954513

प्रभारी अधिकारी, उपनगर पोलीस ठाणे
9028954514

प्रभारी अधिकारी, नवापूर पोलीस ठाणे
प्रभारी अधिकारी, विसरवाडी पोलीस ठाणे
9028954516.
9028954517

प्रभारी अधिकारी, शहादा पोलीस ठाणे
9028954518

प्रभारी अधिकारी, सारंगखेडा पोलीस ठाणे
9028954519

प्रभारी अधिकारी, धडगांव पोलीस ठाणे
9028954520

प्रभारी अधिकारी, म्हसावद पोलीस ठाणे
9028954521

प्रभारी अधिकारी, अक्कलकुवा पोलीस ठाणे
9028954523

प्रभारी अधिकारी, मोलगी पोलीस ठाणे
9028954524

प्रभारी अधिकारी, तळोदा पोलीस ठाणे
9028954525

प्रभारी अधिकारी, शहर वाहतूक शाखा, नंदुरबार
9028954526

प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, नंदुरबार
9028954527

राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, नंदुरबार
9028954529

प्रभारी अधिकारी, महिला सेल, नंदुरबार
9028954530

प्रभारी अधिकारी, सायबर सेल, नंदुरबार
9028954535

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button