तळोदा – शोभायात्रेत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ६,१०,००० रुपयांचे सोने लुटले! पाच जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास

तळोदा
येथे दिनांक ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजता श्री शिवमहापुराण कथा वाचक प्रदिप मिश्राजी यांची शोभायात्रा दत्त मंदिर ते बिरसा मुंडा चौक पावेतो काढण्यात आली होती.
या शोभायात्रेत अफाट जनसैलाब उसळला होता. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ करत लाखो रुपयांची सोन्याच्या चैन गायब केल्यात. एक दोन नव्हेतर तब्बल पाच जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनवर चोरांनी हात फिरवला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
१)विश्वनाथ नारायण कलाल यांच्या गळ्यातील २,५०,०००/- रु किंमतीची ५ तोळे वजनाची सोन्याची चैन
२) प्रितेश कुशेंद्र सराफ यांच्या गळ्यातील १,७५,०००/- रु किंमतीची ३.५ तोळे वजनाची सोन्याची चैन
३) शरद रमणलाल चौधरी यांच्या गळ्यातील ७५,०००/- रु किंमतीची सोन्याची चैन व पेंडल
४) शंकर पवार यांच्या गळ्यातील ७५,०००/- रु किंमतीची सोन्याची चैन
५) राजेंद्र सुभाष चौधरी यांच्या गळ्यातील ३५,०००/- रु किंमतीची सोन्याची चैन
असे एकुण ६,१०,०००/- रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे.
या घटनेमुळे तळोदा शहरात एकच खळबळ उडाली आहे. भक्तिमय वातावरणात उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याने भितीची वातावरण निर्माण झाले आहे.
चोरांचा सुळसुळाट तळोदा शहरात वाढल्याने मुद्देमाल हस्तगत करुन चोरांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिस प्रशासनापुढे आव्हान उभे आहे.