विरदेल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी

विरदेल
दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी विरदेल तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ग्रामपंचायत विरदेल तालुका शिंदखेडा यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
कार्यक्रम स्थळी उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ सुवर्णा सतीश बेहेरे व ग्रामपंचायत उपसरपंच सौ वैजंताबाई भगवान गावित ग्रामपंचायत सदस्य , गावातील सामाजिक कार्यकर्ते, गावातील तरुण मंडळी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेम करणारे असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
सामाजिक कार्यकर्ते सतीश गोटू बेहेरे व मधुकर पृथ्वीराज बेहेरे यांनी बाबासाहेबांचे विचार व कार्य आचरणात आणून आपले भविष्य समृद्ध करावे असे सांगितले. उपस्थित सर्व गावकरी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.शेवटी बाबासाहेब यांच्या विषयी घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.