“स्वयंघोषित उपाध्यक्षांनी घेतलेली सभा ही बेकायदेशीर” -भरत माळी,अध्यक्ष कॉलेज ट्रस्ट तळोदा.
तळोदा कॉलेज ट्रस्ट वाद
तळोदा
तळोदा येथील कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी हे असताना त्या ठिकाणी तथाकथित उपाध्यक्ष सुधीर कुमार माळी यांनी उपाध्यक्ष असल्याचे भासवत ट्रस्टच्या सभेचे आयोजन (ता.६) रोजी केलेले आहे. त्यामुळे ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी यांनी ही सभा बेकायदीर असून कॉलेज ट्रस्टचा याच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरत बबनराव माळी अध्यक्ष आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ट्रस्ट तळोदा जिल्हा नंदुरबार यांनी सर्व सभासदांना उद्देशून सांगितले आहे की, दिनांक (ता.११) जुलै २०२१ ट्रस्टच्या रोजी कार्यकारी मंडळाच्या ठराव क्रमांक पाच अन्वये त्यावेळचे विद्यमान अध्यक्ष सुदामभाई शंकरभाई पटेल यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे ठराव क्रमांक पाच अन्वये भरतभाई माळी यांची अध्यक्षपदी निवड झालेली होती. यासंदर्भात कागदपत्रे ज्यात सभासद यादी, सभेचा अजेंडा कार्यकारी मंडळाच्या सभेची उपस्थिती प्रत, अजेंडा प्रत,घटनेची प्रत, माजी अध्यक्ष यांच्या राजीनामाची प्रत व इतर सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नंदुरबार विभाग नंदुरबार यांच्याकडून फेरफारास रीतसर मंजुरी मिळाली होती त्या अनुषंगाने ट्रस्टचे काम व्यवस्थित पद्धतीने सुरू होते.
त्यात संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारी असलेले प्राचार्याचे पद स्थायी स्वरूपात नुकतेच भरण्यात आले आहे. त्यास विद्यापीठाकडून रीतसर मान्यता देखील मिळालेली आहे असे असताना ट्रस्टचे सभासद सुधीरकुमार गिरधर माळी हे स्वतःला ट्रस्टचे स्वयंघोषित उपाध्यक्ष समजत असून त्यांनी ट्रस्टचे बेकायदेशीर लेटरहेड बनवले असून त्याच पद्धतीचा ट्रस्टचा उपाध्यक्षपदाचा रबर स्टॅम्प शिक्का देखील बनवला आहे त्याच अनुषंगाने लेटर पॅडच्या माध्यमातून दिनांक (ता.६) रोजी सभेचे आयोजन तळोदा या ठिकाणी केलेले आहे. आणि त्या संदर्भातील पत्र सभासदापर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.मात्र उपाध्यक्ष याबाबतची कुठलेही पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे सभेचे आयोजन करणे आणि सभेत ट्रस्टपदी इतरांना नियुक्ती संदर्भातील विषय आणने हे मुळात बेकायदेशीर आहे. याला कुठलाही प्रकारचा कायदेशीर आधार नाही किंवा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचा कुठलाही पुरावा नसल्याबाबत भरत माळी यांनी दिलेल्या आपल्या प्रेसनोट मध्ये म्हटले आहे. त्यामुळे संबंधित स्वयंघोषित उपाध्यक्षांनी आयोजित केलेली ही सभा बेकायदेशीर आहे यात कॉलेज ट्रस्ट तळोदा अध्यक्ष या नात्याने माझा काही एक संबंध नाही तरी सभासदांनी या सभेस उपस्थित न राहता आपला वेळ वाया घालू नये असे भरतभाई माळी यांनी सांगितले आहे. त्याच पद्धतीने ही सभा आयोजित केल्याबाबत स्वयंघोषित उपाध्यक्षांना ही सभा कशी बेकायदेशीर आहे या संदर्भात दूताकरवी पत्र पाठविले आहे तसेच पोस्टाकडून व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखील त्यांना पत्र पाठवले आहे असे असतानाही सभा घेतल्यास या सभेमध्ये घेण्यात येणारे निर्णय हे अध्यक्ष या नात्याने मला बंधनकारक राहणार नाही असेही त्यांनी आपल्या प्रेस नोट मध्ये नमूद केलेले आहे त्यामुळे या सभेला कुठलाही तांत्रिक आधार नाही त्यामुळे ही सभाच बेकायदेशीर असेल असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष या नात्याने भरत माळी यांनी केले आहे.