धुळे
जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यावतीने शाळकरी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
धुळे प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील खंडलाय खुर्द या गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार कुणाल पाटील यांच्या मदतीने जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यावतीने खंडलाय खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात वह्या आल्याने त्यांच्या निरागस चेहऱ्यावर आनंदाने हसू उमलले.
स्तुत्य उपक्रमाबद्दल शिक्षकांनी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे आभार मानले. याप्रसंगी खंडलाय खुर्द गावातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिवर्तन 24 न्यूज
धुळे तालुका प्रतिनिधी
संकेत बागरेचा नेर