नंदुरबार
धुळे, नंदूरबार जिल्ह्याला आज यलो अलर्ट, राज्यात कुठे कुठे पावसाची शक्यता?
राज्यात बहुतांश भागात मुसळदार पावसाचा हाहाकार बघायला मिळाला आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, आजही राज्यात मुसळदार पावसाची शक्यता हवामान विभाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितनुसार, रायगड रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच तिथं अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर मुंबईसह ठाणे,पालघर, सिंधुदुर्ग,आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर धुळे आणि नंदुबार जिल्हांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती,वर्धा, चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,भंडारा,गोंदिया,या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.