सर्पमित्रांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
नंदुरबार
अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणिमित्र संघटना यांच्या नेतृत्वाखाली वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारच्या वतीने सर्पमित्रांच्या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी यांना आज रोजी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,
१) सर्पमित्रांना प्राणी मित्रांना अपघाती विमा, व सर्पदंश उपचार विमा मिळने बाबत
२) सर्व सर्पमित्रांना प्राणी मित्रांना शासकीय ओळखपत्र मिळने
३) सर्पमित्र प्राणी मित्र यांच्या सेवेला अत्यावश्यक सेवेत ( फ्रंट लाईन वर्कर्स ) सदरा मधे समाविष्ट करणे
४) सर्पमित्रांची माहिती देनारे, नोंदनी करनारे नेटवर्कर आणि पोर्टल उभारावे
अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार चे अध्यक्ष संजय नाना वानखेडे,सचिव जितेंद्र रमेश खवळे,पंकज दुरवरसिंग पावरा ,कैलास प्रकाश वळवी, आशिष विजय ठाकुर,कैलास अशोक देसाई, दर्शन चित्तरंजन भावसार,गोरख दगा पाटील,चेतन रमेश पाटील, राहुल तुळशीराम गावीत,सुरज सुभाष वळवी, पंकज छोटुलाल चित्ते, राहुल कैलास खैरनार, मोहित राजेंद्र देसले, प्रदीप धोंडु पाटील, रिषीकेश अशोक कुंवर ,तेजस अमृत पाटील आदी उपस्थित होते.