नंदुरबार

महिलेचे गहाळ झालेले पर्स दामिनी पथकातील महिला पोलीसांनी काही वेळातच दिले शोधुन…!

नंदुरबार -:दि.11 सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील बस स्टॅन्ड परिसरात शिरपूर कडे जाणा-या बस मध्ये प्रवास करणा-या एका महिलेचे पर्स गहाळ झाल्याची घटना घडली.
सदर महिलेने लागलीच बसचालकास बस थांबविण्याची विनंती केली व तेथे जवळच उपस्थित असणा-या पोलीसांना याबाबतची माहिती दिली.
सदर महिलेचे पर्समध्ये महत्वाचे कागदपत्रे व काही रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन तेथे उपस्थित शहर पोलीस ठाण्याचे पोशी रामेश्वर डोईफोडे व पोशी भगवान मुंडे यांनी लागलीच सदर ठिकाणी शोध घेणे सुरु केले तसेच बसमध्ये देखील पर्स बाबत विचारणा सुरु केली परंतु बसमध्ये काही महिला प्रवासी देखील असल्याने त्यांनी जवळच असलेल्या दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार संगीता साबळे व महिला पोलीस नाईक कौशल्या गावीत यांना बोलावून सदर घटना सांगितली व महिलेचे पर्सचा शोध घेणेबाबत कळविले. त्यावरुन निर्भया पथकातील दोनही महिला पोलीस अंमलदार यांनी आजूबाजजूचे परिसरात व बसमधे शोध घेतला असता महिलेचे पर्स हे बसमधील एका सीटचे खाली मिळून आले.
सदर पर्स हे महिला पोलीसांनी ताब्यात घेऊन ते पर्स त्याच महिलेचे आहे अगर कसे याबाबतची खात्री करुन त्यानंतर महिलेचे ताब्यात दिले.
त्यावेळी पर्स मिळालेल्या महिलेने महिला पोलीस अंमलदारांचे आभार मानले, व परिसरातील नागरिकांनी पोलीसांचे कामगिरीबाबत अभिनंदन करुन समाधान व्यक्त
केले आहे.
उल्लेखनीय कामगिरी करणारे दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार मपोहेको संगिता साबळे,मपोना कौशल्या गावीत तसेच त्यांचेसोबत असई जगन पावरा, चालक रामदास माळी, शहर पोलीस ठाण्याचे पोशि. रामेश्वर डोईफोडे व पोशि भगवान मुंडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी प्रशंसा करुन त्यांनी यापुढे देखील अशाच प्रकारची उल्लेखनीय कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रविण चव्हाण परिवर्तन 24न्युज नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button