जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दृष्टी दिन साजरा

नंदुरबार
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी “जागतिक दृष्टि दिवस” साजरा करण्यात येत असून राज्यस्तरीय प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे विशेष जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे जिल्ह्यातील सर्व वयोगटातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी तसेच डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया व नेत्रदानाबाबत समुपदेशन करण्यात येत असून पात्र नागरिकांना मोफत चष्मे, दिव्यांग प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात येत असतात. यावर्षी 2024 मध्ये राज्यस्तरावरून “तरुण लोकांना डोळयांची काळजी घेण्याच्या महत्वावर जगाचे लक्ष केंद्रीत करणे आणि सर्वत्र मुलांना त्यांच्या डोळयांवर प्रेम करण्याची प्रेरणा देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या वर्षातील जागतिक दृष्टी दिनाकरीता International Agency for prevention of blindness (IAPB) ने “ Love your Eyes, Kids” “मुलांनो – तुमच्या डोळ्यांवर प्रेम करा,” हे घोष वाक्य निश्चित करणे करीता समर्थन केले असून त्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नागरिकांसाठी जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. रवींद्र सोनवणे, व इतर उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांचे डोळ्यांच्या विशेष काळजी साठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी मार्गदर्शन केले. व नागरिकांनी जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठीचे आव्हान देखील केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी “जागतिक दृष्टी दिनानिमित्त नेत्र शल्य चिकित्सक डॉ.नरेंद्र खेडकर यांनी लहान मुलांच्या डोळ्यांची स्वच्छता व काळजी, ४० वय पूर्ण झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यांची स्वच्छता व काळजी या बाबत सविस्तर माहिती दिली. दृष्टी दिनानिमित्त एस. आर. महाले नेत्र चिकित्सा अधिकारी यांनी सर्व वयोगटातील उपस्थित लाभार्थ्यांची “विशेष नेत्र तपासणी” उपक्रम राबविला. नेत्रदान समुपदेशक प्रियंका ढीवरे यांनी नागरिकांना नेत्रदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले,व नेत्रदान विषयक पत्रके वाटप केलीत. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ.रवींद्र सोनवणे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना बागुल,अतिरिक्त आरोग्य अधिकारी,डॉ.अमित कुमार पाटील, डॉ.नरेश पाडवी,नेत्र शल्य चिकित्सक डॉ.नरेंद्र खेडकर,डॉ.प्रज्ञा वळवी, एस.आर.महाले नेत्र चिकित्सा अधिकारी,वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश वळवी,
आधी सेविका नीलिमा वळवी, जिल्हा समन्वयक डॉ. विशाल वळवी,डॉ.कल्पेश चव्हाण अज्जीतेम सोनवणे,नेत्र दान समुपदेशक प्रियंका ढिवरे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषीकेश पतंगे यांनी केले तर डॉ. विशाल वळवी जिल्हा समन्वयक यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचां समारोप केला.
प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार