सावधान….!! तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

तळोदा
तापी नदी कॅचमेन्ट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.सध्या स्थितीत हतनूर धरणाचे 16 गेट 1.5 मीटरने उघडले असुन 70000 क्युसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरु आहे.तसेच आज सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:00 वाजता 18 गेट 1.5 मीटरने उघडण्यात आले असुन 8000 ते 10000 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात हतनूर धरणातून सोडण्यात आले आहे.
सध्या स्थितीत सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये 48000 क्युसेक पाण्याचा येवा सुरु असुन सारंगखेडा बॅरेजचे 4 गेट 3 मीटरने उघडले असुन 45768 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे व प्रकाशा बॅरेजचे 5 गेट 3 मीटरने उघडले असुन 50359 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक लक्षात घेता पुढील काही तासात सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात येईल.
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्यामुळे तापी नदी काठावरील गावांना याद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.तापी नदी काठावरील नागरिकांनी आपले गुरे व प्राणी नदी काठावर सोडू नये तसेच पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी ठेवावे.नागरिकांनी तापी नदी काठावर जावू नये असे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे.
असे प्रसिद्ध पत्र दिनांक 14/10/2024 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नंदुरबार श्री हरिष भामरे यांनी काढले आहे.