नंदुरबार

सावधान…निवडणूकीचे काळात व्हाट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल..!नंदुरबार सायबर सेलची कारवाई

नंदुरबार
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तथापि काही उपद्रवी समाजकंटकांकडून समाजातील शांतता भंग होण्यासाठी छुपे प्रयत्न सुरू असतात.

त्याअन्वये दि.23 ऑक्टोबर 2024 रोजी नंदुरबार पोलीस सोशल मिडीयावर लक्ष ठेऊन असतांना गोपनीय माहिती मिळाली कि, एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरील एका मोबाईल क्रमांक धारकाने आगामी विधानसभा निवडणूकीचे अनुषंगाने मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करुन दोन समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल, अशी व्हिडीओ पोस्ट केल्याने सदर व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मोबाईल क्रमांक धारक निलेश चौधरी, रा.शांती नगर, नंदुरबार याचे विरुध्द शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 196(1)(a), 353(2) तसेच लोकप्रतिनिधित्व अधि. 1989 चे कलम 125 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि. स्वप्नील पाटील करित आहेत.
तरी नागरिकांनी आगामी निवडणुका तसेच सण उत्सवात दोन धर्मात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनुचित पोस्ट व्हिडीओ गैरसमज पसरवू नये. आपले पोस्ट वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माची अथवा समाजाची भावना दुखावणार नाही, याची प्रत्येकाने
खबरदारी घ्यावी.
तसेच नागरिकांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी पोलीस प्रशासनास
सहकार्य करावे.

नंदुरबार सायबर सेल अशा प्रकारचे सोशल मिडियावर गैरसमज व अफवा
पसरविण्या-यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट दिसून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधवा.

असे यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी आवाहन केले आहे ”

प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button