नंदुरबार पोलीसांनी केली अल्पवयीन मुलीची सुखरुप सुटका..!

प्रविण चव्हाण
नंदुरबार -:
दि.31 डिसेंबर 2024 रोजी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांना माहिती मिळाली की, कोठली गावात एका महिलेला डांबून ठेवले आहे, याबाबत माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सदर बाबत कळवून त्यांचे पथक रवाना केले.
सदर पथकाने उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजन मोरे व स्टापचे मदतीने कोठली गावात जाऊन मिळालेल्या माहितीची खात्री केली असता, माहितीप्रमाणे पिडीत महिलेचा शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही.तरी सदरचा प्रकार हा गंभीर असल्याने पोलीस पथकाने महिलेचा फोटो गावातील लोकांना दाखवून सदर महिला कुठे आहे.याबाबत चौकशी केली असता, मिळालेल्या माहितीची खात्री करुन कोठली गावातील एका घरात नमुद वर्णनाची पिडीत महिला असल्याचे समजले, तेथे पोलीस पथकाने जाऊन पाहणी करता पिडीत महिला एका घरात मिळून आली. तिस तिचे नाव गाव विचारता तिने तिचे नाव असे सांगितले, सदर पिडीत ही (17) वर्षीय अल्पवयीन बालिका असल्याचे समजले व तिला मध्यप्रदेश येथुन तिचे नातेवाईक घेऊन आले असुन ते बालिकेचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याचे सदर अल्पवयीन बालिकेने पोलीस पथकास कळविले.
त्याअन्वये पोलीस पथकाने सदर अल्पवयीन बालिकेची त्या घरातून सुखरुप सुटका करुन तिस चाईल्ड वेलफेअर कमिटी यांचेसमक्ष हजर केले आहे.
सदर अल्पवयीन बालिकेला तिचे पालकांचे ताब्यात देऊन पुढील योग्य ती कार्यवाही उपनगर पोलीस ठाण्याकडून करण्यात येणार आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे स.पो.नि.राजन मोरे व पथक यांनी केली आहे.