जिल्हा पोलीस दलातर्फे येत्या शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन..!

नंदुरबार
विविध पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांचे काही तक्रारी समस्या असल्यास त्याचे लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व सोशल पोलिसींगचे माध्यमातून जनतेशी संवाद साधता यावा, या उददेशाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांनी प्रत्येक शनिवारी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा स्त्युत्य उपक्रम सुरु केला आहे.
मागील आठवडयात पोलीस अधीक्षक यांनी शहादा पोलीस ठाणे येथे तर अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी म्हसावद पोलीस ठाणे येथे उपस्थित राहून नागरीकांचे समस्यांचे निवारण केले होते, त्यामध्ये नागरिकांचे वेगवेगळ्या तक्रारीचे निरसन करण्यात येऊन एकुण 217 तक्रारींपैकी 167 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने शनिवार दि. 08 फेब्रुवारी 2025 रोजी 11 ते 01 वाजेदरम्यान जिल्हयातील नागरिकांसाठी विविध पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असुन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस हे स्वतः शहर पोलीस ठाणे येथे तर अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे हे सारंगखेडा पोलीस ठाणे येथे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून व समजून घेत त्यांचे तक्रारींचे निवारण करणार आहेत.
तरी नागरिकांनी सदर तक्रार निवारण दिनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी केले आहे.
प्रविण चव्हाण नंदुरबार