नंदुरबार
जनतेशी संवाद या उपक्रमांतर्गत आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून जाणल्या समस्या

नंदूरबार
शहारातील यावेळी नागरिकांनी स्वतंत्र स्मशानभूमी, रस्त्यांची दयनीय अवस्था, अपुरी वीज आणि स्वच्छता सुविधांचा अभाव यासारख्या समस्या मांडल्या. त्यांच्या व्यथा ऐकून आमदार डॉ. गावित यांनी या भागाच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर विशेष भर देत, त्यांनी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून गृहउद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच, युवकांना रोजगाराच्या नवीन संधी शोधण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
परिसरातील रस्ते, वीज, शौचालय आणि इतर मूलभूत सुविधा येत्या एक वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपा कार्यकर्ता केतन रघुवंशी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रविण चव्हाण, नंदुरबार