घरफोडीचा गुन्हा उघडकीस आरोपीकडून एकुण 01,26,700/- रुपये किमतीचे मोबाईल्स हस्तगत

दि. 25/02/2025 रोजी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार श्री. रामचंद्र बठीजा यांचे मोबाईल शंपीतुन अश् गात चोरटयानी दुकानाचे कुलूप तोडून फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडांच्या इरादयाने मोबाईल्स चोरुन नेले म्हणुन शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 150/2025 भा.न्या. संहिता कलम 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असताना दिनांक 06/03/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा तालुक्यातील चिरखान गावात एक इराग महागडे गोबाईल फोन स्वस्त दरात विक्री करीत आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून सदर इसमाचा चिरखान गावी जाऊन शोध सुरु असतांना तो मिळून आला, त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नरेश ऊर्फ लाला दादला पावरा, वय 23 वर्षे, रा.चिखली, गोस्ट मंदाणा, ता.शहादा जि. नंदुरबार असे सांगितले. त्याचे अंगझडतीत त्याचे ताब्यात असलेल्या दोन नविन मोबाईल बाचत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास अधिकचे विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचे मोबाईल हे त्याचे साथीदार सुकलाल ऊर्फ मेंढी मोठा शेगळे, सागर छगन भिल, शंभू कुवरसिंग चव्हाण, सर्व राहणार चिरखान ता. शहादा जि नंदुरबार यांचेसह शहादा शहरातील काशिनाथ मार्केट परिसरातील एका बंद दुकानाचे शटर उचकाढून चोरी केली असल्याचे सांगितले. तरी वर नमुद आरोपीकडुन एकुण 01,26,700/- रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकुण 13 मोबाईल्स हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले मिळाले असुन पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. मुकेश पवार, तसेच पोहेकॉ मोहन ढमढेरे, पोना/पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, अविनाश चव्हाण, पोशि/दिपक न्हावी अशांनी केली आहे.