धडगाव – 06 लाख 24 हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना दि. 07/03/2025 रोजी गुप्त बातमोदारामार्फत बातमी मिळाली की, धडगाव पोलीस ठाणे हद्दीत राहूल तडवी, उमेदसिंग पाडवी, लक्ष्मण पाडवी, शिवदास ऊर्फ भाया पाडवी यांनी आज रोजी इसम नामे वसंत किरमा वळवी, रा. खुंटामोडीचा पितीपाडा ता.धडगाव व नागेश दमण्या वळवी, रा. कात्री ता.धडगाव यांचेकडेस विदेशी दारु व्हिस्कीचे खोके हे खुंटामोडीचा पितीपाडा येथे रस्त्याच्या कडेला एका इ गोपडीत उतरविले असून त्याची ते विना पास परमिटशिवाय गैरकायदा आपले कब्जात बाळगुन तिची चोरटी विक्री करणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. सदर माहितीचे आधारे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त, एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी धडगाव पोलीस ठाणे पथक यांचे मदतीने नमुद बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री केली असता दोन इसम हे रस्त्याच्या कडेला एका झोपडी जवळ संशयितरित्या फिरत असतांना दिसले. सदर इसमांवर छापा कारवाई करित असतांनाच त्यांना पोलीस आल्याचे लक्षात आल्याने दोन्ही इसम झोपडीचे मागील बाजुने झाडाझुडपातून पळू लागले. पोलीस पथकाने दोनही इसमांना ओळखले व त्यांना आवाज देऊन थांबण्यास सांगितले परंतु दोन्ही इसमांनी डोंगरद-यांचा फायदा घेऊन तेथून पळ काढला. सदर इसम संशयितरित्या फिरत असलेल्या झोपडीचे ठिकाणी पोलीसांनी तपासणी करता तेथे विदेशी दारुचा एकुण 6,24,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश मिळाले आहे. त्याअन्वये इसम नामे 1. राहूल मानसिंग तडवी, रा.भगदरी 2. उमेदसिंग गोविंदसिंग पाडवी, रा. काठीचा निंबीपाडा 3. लक्ष्मण विक्रम पाडवी, रा.काठी ता अक्कलकुवा 4. शिवदास ऊर्फ भाया कुवरसिंग पाडवी, रा. रोझवा ता. तळोदा 5. वसंत किरमा वळवी, रा. खुंटामोडीचा पितीपाडा ता. धडगाव 6. नागेश दमण्या वळवी, रा. कात्रो ता. धडगाव यांचे विरुध्द धडगाव पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोकों/दिपक न्हावी, अभिमन्यु गावीत, धडगाव पोलीस पथक अशांनी केली आहे.